हसूल परिसरात तरुणाची निघृण हत्या

Foto
बहिणीच्या विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याने केले कृत्य : दोघांना ठोकल्या बेड्या
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): हसूल परिसरातील कोळठाणवाडी रोडवर विवाहाचा प्रस्ताव फेटाळल्याच्या जुन्या रागातून एका तरुणाची पोटात चाकू भोसकून हत्या करण्यात आली. उमर कॉलनीतील २२ वर्षीय शेख मोहम्मद फैसल अब्दुल कादर असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेनंतर हसूल पोलिसांनी मुख्य आरोपी २५ वर्षीय रेहान अमीन पटेल (रा. करीमनगर, हसूल) आणि त्याचा साथीदार समीर रईस शेख (२२, रा. हसूल) या दोघांना सावंगी फुलंब्री परिसरातून जेरबंद केले.
मृत फैसलने हसूलच्या करीमनगर भागात मेडिकल स्टोअर सुरू केले होते. फैसलचा मोठा
जिल्ह्याच्या बाहेर पळण्यापूर्वीच जेरबंद
▶ पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक आयुक्त मनोज पगारे, हसूल पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार आणि सहायक निरीक्षक सचिन सदाफुले यांनी कच्ची घाटी, पीरवाडी, रसूलपुरा ते खुलताबादपर्यंत कसून शोध घेतल्यानंतर, हे दोन्ही आरोपी जिल्ह्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना सावंगी फुलंब्री शिवारातून रात्री उशिरा अटक केली. मृत फैसलच्या भावाच्या फिर्यादीवरून हसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊ शेख मुस्तकीम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सहा महिन्यांपूर्वी मुख्य
आरोपी रेहानच्या कुटुंबाने फैसलच्या लहान बहिणीसाठी विवाहाचा प्रस्ताव
कुराण वाचतानाच हल्ला
▶ रेहान इंटरनेट केबल ऑपरेटर म्हणून काम करतो. तो सुशिक्षित कुटुंबातून असला तरी व्यसनाधीन आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संगतीत राहत होता. तीन दिवसांपूर्वीच रेहानने आपले मेडिकल स्टोअर जाळल्याचा संशय फैसलला होता. यादरम्यान शुक्रवारी दुपारी एक वाजता फैसल मेडिकल स्टोअरमध्ये बसून कुराण-पाक वाचण्यात मग्न होता. याच वेळी रेहान आणि त्याचा साथीदार समीर अचानक दुकानात घुसले आणि त्यांनी फैसलला बेदम मारहाण करत दुकानाबाहेर ओढून धारदार चाकू फैसलच्या पोटात खुपसला. हल्ल्याचा वार खोल लागल्याने चाकू पोटात तसाच सोडून हल्लेखोर पसार झाले. गंभीर जखमी फैसलला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले; परंतु अतिरक्तस्त्रावामुळे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. फैसलच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.
पाठवला होता. मात्र, तरुणीचे लग्न आधीच अन्यत्र ठरले असल्यामुळे फैसलच्या कुटुंबीयांनी हा प्रस्ताव नाकारला होता. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या
रेहानला हा नकार जिव्हारी लागला. त्यानंतर तो सातत्याने फैसल व त्याच्या कुटुंबीयांना त्रास देऊ लागला.
https:/lepaper.sanj Powered By Vrudhee Solutions